कृष्णेचे धोम-वाई-मेणवली -महाबळेश्वर


लक्ष्मी-नृसिंह मंदिर - धोम 

मराठ्यांच्या राज्यकाळात बांधले गेलेले हे दगडी बांधणीचे सुबक मंदिर. ह्या एकाच प्रांगणामध्ये लक्ष्मी नृसिंह आणि शंकर अशी दोन देवस्थाने आहेत. 


सोळा पाकळ्यांच्या पाषाणकमळामध्ये बसण्याचे भाग्य लाभलेला शंकराच्या पिंडी समोरचा हा नंदी. 





श्री क्षेत्र महाबळेश्वर जवळचे हे काळ्या चिऱ्यामध्ये बांधलेले कृष्णाबाई मंदिर. जरा आडवाटेचे, राकट रूपाचे, निर्मनुष्य.. खालच्या दरीतले बेफाट वाऱ्याचे झोत सहन करणारे मूक आणि गंभीर असे हे देवस्थान खरे तर एक शिवमंदिर आहे  




आत मंदिरामधले सुंदर बांधलेले पायऱ्यांचे जल कुंड, तिन्ही बाजूस  दगडी महिरपदार खांबांनी सजवलेली ओवरी, मालकाच्या आज्ञेत दक्ष बसलेला नंदी आणि गाभार्याच्य्या शांत अंधारामध्ये, जास्वंदी-कोर्हांटीच्या कोमल पाकळ्यांमध्ये विराजलेला तो महादेव..



मेणवलीचा चित्रासारखा देखणा घाट, कळसाची रेखीव मंदिरे , पुरातन वृक्षांची आश्वासक सावली... नदीचा वाहता प्रवाह.. 




वाई - दगडी घाटाच्या पायऱ्या कृष्णामाई पर्यंत उतरत जाणाऱ्या 


Comments

Popular Posts