Skip to main content

Posts

Featured

नगरी नगरी, द्वारे द्वारे

श्रीनगर   श्रीनगरच्या डुलत्या होड्या ,  नागमोडी दाटीवाटीच्या गल्ल्या ,  झेलम वरचे अनेक पूल  ,   चिनार चे भव्य डेरे यामधून सातत्याने भेटत राहते ही रमणीय निळाई. दूरवर उभ्या काश्मीर च्या पर्वतरांगाची  पार्श्वभूमी लाभलेले हे स्वर्गीय दाल सरोवर  आणि उन्हाचा चटका जराही जाणवू ना देणारा नितळ गारवा. . किती काय काय बघितले असेल या सरोवराने  ,  आणि किती तरंग उठले असतील त्या प्राचीन जलराशीमध्ये  ,  हे त्या सर्वव्यापी काळालाच ठाऊक. जबलपूर   जबलपूर शहराला सोबत लाभली आहे त्या धुवांधार धबधब्याची आणि नर्मदेच्या  अव्याहत प्रवाहाची. नदीच्या लागत उभ्या एका टेकडीवरच्या गोलाकार भव्य ८१ योगिनींच्या मंदिराबाहेरून दिसतो तो नर्मदेचा निळा वळणदार तुकडा ,  घाट आणि घरांची गर्दी आणि घाटावरच्या देवळांचे कळस. नाशिक हा गोदावरीचा तीर ,  भक्तीने, देवळांनी  ,  माणसांनी गजबजलेला. त्याचवेळी बकालीचे अंधारे सावट वागवणारा  ,  संथ पाण्याच्या प्रवाहाचा रंग शोधणारा ,  शुचितेच्या आठवणीनी विषण्ण होणारा .   लेपाक्षी...

Latest Posts

आठवणी -१

गिरी शिखरी, कुंजवनी

कोणे एके काळी, एकशिला नगरी..